Watch Video : 'मी नाराज नाही, मंत्रिपद मिळालं तरी ठीक नाही मिळालं तरी चालेल' - आशिष जयस्वाल मंत्रिमंडळ विस्तार प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - मंत्रिमंडळात माझी वर्णी लागेल की नाही आता सांगता येणार नाही. मी नाराजी व्यक्त केलेली नाही. तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे गतिमान शासन काम करेल. नाराज होण्याचे काही काम नाही. मी आरोप के.सी पाडवी यांच्या संदर्भात केला होता. अजित पवार यांचे काम चांगले आहे. मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा होईल तेव्हा होईल, मी माझ्या मतदारसंघात काम करण्यात व्यस्त आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, माझ्या नेत्यांनी अनेक जबाबदाऱया मला दिल्या आहेत. यावेळी अपक्ष आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत नसेल तर पुढच्या यादीत असेल असा विश्वास आहे. महाराष्ट्रासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे. तसेच १७ तारखेला पक्षाची बैठक आहे, हर घर दस्तकच्या माध्यमातून अनेक कामे होत आहेत त्यामुळे मी नाराज नाही, शिवाय कुठलाही आमदार नाराज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.