Shiv sena March In Kolhapur: शिवसेनेचा रेशन कार्ड संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - रेशन कार्ड संदर्भात शिवसेनेच्या मागण्या
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - रेशन कार्ड संदर्भात विविध मागण्यांसाठी कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. रेशन कार्डावरील उत्पन्नाची किमान मर्यादा दोन लाख रुपये करा. तसेच, रेशन कार्ड बंद करू नका, गॅस सिलेंडरची किंमत पाचशे रुपये करा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. (Shiv sena March In Kolhapur) यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवरे, रवीकीरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST