शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई - शिंदे गटात जाण्यास नकार देणाऱ्या मातोश्रीच्या निष्ठावंत शिलेदारांची पोलीस बळाचा गैरवापर करून छळवणूक सुरू करण्यात आली आहे. या गुंडगिरीचा कडाकडून विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज बुधवार (दि. 19 ऑक्टोबर)रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. गेल्या अडीच महिन्यांत एकीकडे शिंदे गटाच्या आमदातांना पोलीस संरक्षण दिले जात असताना शिवसेनेच्या निष्ठावंतांचे पोलीस संरक्षण मात्र काढण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी खासदार राजन विचारेंचे पोलीस संरक्षण कमी करण्यात आले आहे. याचाही यावेळी निषेध करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या मोर्चामध्ये ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांबरोबर शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत हेही सहभागी झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST