Shiv Sainik Protest : शिवसैनिक आक्रमक; पुण्यात कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन - शिवसैनिक आक्रमक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15977124-thumbnail-3x2-pune.jpg)
आज सकाळी ७ वाजल्यापासून, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत; ईडीने (ED Inquiry) त्यांची चौकशी सुरू केली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर, ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यानंतर, राज्यभर शिवसैनिक हे आक्रमक झाले. पुण्यात शिवसैनिकांच्या वतीने सारसबाग येथे रास्ता रोको आंदोलन (Shiv Sainik protest) करून, केंद्र सरकरचा निषेध करण्यात आला. 'भाजप हमसे डरती है,ईडी को आगे करती है' अशी घोषणाबाजी करत, शिवसैनिकांनी आक्रमकपणे सारसबाग (Pune Saras Baug) येथे, रास्ता रोको आंदोलन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST