Shirdi Saibaba donation : साईबाबा प्रसादालयात साडेतीस लाखांचं 'पीठाचं यंत्र' दान, पहा व्हिडिओ - donation of flour machine
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 30, 2023, 2:17 PM IST
शिर्डी : Shirdi Saibaba donation शिर्डीचे साईबाबा हे जगभरातील कोट्यवधी भक्तांचं श्रद्धेचं केंद्र आहे. येथे येणारे भाविक शिर्डी संस्थानच्या साई प्रसादालयात प्रसाद घेतात. साई संस्थानच्या प्रसादालयात आता आटा युनिट बसवण्यात आलं आहे. भाविकांना आता शुद्ध आणि चांगल्या प्रतीच्या पीठाच्या चपाती खाता येणार आहे. या आधी साईसंस्थानकडे तासी 400 किलो पीठ निर्माण करणारी गिरणी होती. मात्र आता दुपटीनं पीठ या गिरणीतून बाहेर पडणार असून गर्दीच्या काळात हा गिरण अत्यंत लाभदायक ठरणार आहे. साईबाबांना बंगळुरू येथील साईभक्तांनी 30 लाख 50 हजार रुपये किमंतीचं स्वयंचलीत आटा युनिट दान दिले. गहू निवडण्यापासून ते कोंडा काढण्यापर्यंत सर्व काम हे मशीन करणार आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी या दानशूर भाविकाचा शाल आणि साईबाबा मूर्ति देऊन सत्कार केला.