Sharad Pawar News: शरद पवारांना सुप्रिया सुळेंचा धाक, म्हणाले एकच मुलगी असल्याने ऐकावं लागतं... - यशस्विनी महिला सन्मान सोहळा आयोजन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : शरद पवार यांची मुलगी असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या एकुलत्या एक आहेत. एवढ्या मोठ्या मुलीचा राजा बाप, असे एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य करण्यात आले. त्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, तुम्हाला दुसरी बाजू कळणे महत्त्वाचे आहे. घरात मला नेहमी बोलणं खावं लागतं, तुमचे वय काय, किती जागता, किती कार्यक्रम घेता, किती लोकांना बोलता, किती ऐकावे असे वाटते. पण एकच असल्यामुळे मलासुद्धा पर्याय नसल्याचे शरद पवार म्हणाले. त्यावेळी सभागृहात एकच हास्य उमटले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. पुण्यात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यशस्विनी महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. मंचावर खासदार सुप्रिया सुळे, जावेद अख्तर शबाना आजमी हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. यावेळच्या मार्गदर्शन भाषणात शरद पवार यांनी आपल्या वेदनेची खंत व्यक्त केली आहे. माझ्या काळजीपोटी का होईना या वेदना मला सहन कराव्या लागतात, असे म्हणत त्यांनी सभागृहात सुप्रिया सुळे यांची अडचण सांगून टाकली.