शरद मोहोळ हत्या प्रकरण : 'मी' मामासाठी हत्या करणार, आरोपीचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर - शरद मोहळ प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 6, 2024, 10:56 PM IST
पुणे Sharad Mohal murder case : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर गेल्या 25 दिवसांपासून शरद मोहळच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ आहेत. बाहुबलीमध्ये चित्रपटाच 'मामा'नं हत्या केलीय, इथ मात्र, 'मी' मामासाठी हत्या करणार असल्याचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळं ही हत्या पूर्वनियोजित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल दुपारी दीडच्या सुमारास शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दोन वकिलांसह आठ जणांना अटक केली आहे. शरद मोहोळ घरातून बाहेर आल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी तिघांनीही वेगवेगळ्या बंदुकांचा वापर केलाय. त्यानंतर आरोपींनी एकत्र येत स्विफ्ट कारमधून पोबारा होण्याचा प्रयत्न केलाय.