Bhim Army Protest In Amravati: अमरावतीत संभाजी भिडे यांचा निषेध; भीम आर्मीने केले आंदोलन - Sambhaji Bhide protested by Bhim Army

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 27, 2023, 3:43 PM IST

अमरावती : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आज (गुरुवारी) अमरावती दौऱ्यावर येणार असतानाच भीम ब्रिगेडच्या वतीने शहरातील नवाथे चौक येथे त्यांचा निषेध नोंदवला गेला. संभाजी भिडे यांच्या पोस्टरवर यावेळी चपला देखील मारण्यात आल्या. भीम आर्मीने केलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ भीम आर्मीने नवाथे चौक परिसरात केलेल्या आंदोलनामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. नवाथे चौक, राजापेठ, साईनगर या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान संभाजी भिडे यांचा निषेध करणाऱ्या भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. शहरात इतर भागात कुठलाही गोंधळ होणार नाही, याबाबत पोलीस लक्ष ठेवून आहेत. संभाजी भिडे यांचे आज बडनेरा मार्गावरील जय भारत सभागृह येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून तरुण मोठ्या संख्येने अमरावती शहरात येत आहेत. सायंकाळी 7 वाजता संभाजी भिडे यांचे व्याख्यान होणार असून या दरम्यान परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, याबाबत पोलीस लक्ष ठेवून आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.