Shirdi Sai baba : सोशल माध्यमांवर साईबाबा संस्थानची बदनामी; संस्थानकडून फेक व्हिडिओ पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा - साई बाबा संस्थानच्या संपर्कात
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी : बांग्लादेश येथील मशीदीत पैसे भरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल करुन हा शिर्डीच्या संस्थानचा असल्याची बदनामी करण्यात आली होती. या प्रकरणी शिर्डीतील साईबाबा संस्थानने हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल करत शिर्डीतील साईबाबा मंदिरातील पैसे मशीदीत भरण्यात येत असल्याची खोटी माहिती प्रसारित करण्यात आली होती. त्यासह शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दान देऊ नका, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र या व्हिडिओची पडताळणी केली असता, तो बांग्लादेशातील असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे देशभरातील भाविकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. अखेर शिर्डीतील साई संस्थानने याविरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रातील सायबर सेल या प्रकरणी साई बाबा संस्थानच्या संपर्कात असून हा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी दिली आहे.