Sachin Tendulkar Statue : उद्घाटनापूर्वीच पाहा वानखेडे स्टेडियमवरील सचिनचा पुतळा - सचिन तेंडुलकर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 22, 2023, 7:26 PM IST
मुंबई : Sachin Tendulkar Statue : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर रोजी या पुतळ्याचं अनावरण होईल. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे हे या पुतळ्यावर काम करत आहेत. प्रमोद कांबळे यांनी स्वत: या कामाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, 'ही घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला यावर काम करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर मी सचिन तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची भेट घेतली. पुतळा कसा बनवायचा यावर आमची चर्चा झाली. तो कुठला षटकार मारतोय याची पोज आम्ही फायनल केली. आम्ही प्रथम एक लघु मॉडेल बनवलं आणि नंतर ते पाहून आम्ही १४ फूट उंच पुतळा बनवला. जगाचा नकाशा आणि क्रिकेट बॉलचं ग्राफिक मिक्स करून आम्ही एक ग्लोब बनवला आणि सचिन तेंडुलकरला त्यावर चित्रित केलं', असं ते म्हणाले.