संविधान टिकवण्यासाठी 'वंचित' महाविकास आघाडीसोबत येईल - रोहित पवार - संविधान
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 5, 2023, 10:32 PM IST
अमरावती Rohit Pawar Statement : 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली. त्याचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्राला बघावा लागला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन झालं. दुर्दैवाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा हा मुद्दा आता पुढे येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगलीचे असे वातावरण का केले जात आहे, याबाबत आता लोक विचार करायला लागले आहेत. यंदा असे विभाजन होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. बीड शहरात ओबीसी विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता. तसंच संविधान टिकवायचं असेल तर आपल्याला भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे असे उमेदवार उभे करायला नको, ज्यामुळं मतांचं विभाजन होईल. यामुळेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल असं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अमरावतीत म्हटलं आहे.