Ravikant Tupkar Diwali Celebration: शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतात सोयाबीन, कापूस पूजन करुन केली दिवाळी साजरी - रविकांत तुपकर दिवाळी साजरी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 11:02 PM IST

बुलडाणा Ravikant Tupkar Diwali Celebration: निसर्गाची अवकृपा आणि शासनाचं शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात आहे. (Farmer Leader Ravikant Tupkar) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या कुटुंबासह आणि शेतकरी बांधवांसोबत आज (रविवारी) रात्रीच्या अंधारात शेतात सोयाबीन आणि कापूस पूजन करुन अनोखी दिवाळी साजरी केली. (Soybean and Cotton Poojan)

तुपकरांची 'एल्गार यात्रा': रविकांत तुपकरांनी सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'एल्गार रथयात्रा' सुरू केली आहे. (Ravikant Tupkar Diwali with Farmers) ५ नोव्हेंबर पासून संतनगरी शेगाव येथील संत गजाननाचे दर्शन घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. ते गावाेगावी फिरुन बैठका, सभा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. दररोज वेगवेगळ्या तालुक्यात मुक्काम होत आहे. दिवाळीच्या दिवशी रविवारी ही यात्रा चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे गावात मुक्कामी आहे. 

'या' कारणाने दिवाळी अंधारात: रविकांत तुपकर यांनी दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाला घरी न जाता आपल्या कुटुंबीयांसह शेतकऱ्यांच्या शेतात अंधारात सोयाबीन आणि कापसाचं पूजन करुन अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली. शेतातील सोयाबीन कापूस हीच शेतकऱ्यांची लक्ष्मी आहे; परंतु त्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांनी देखील आपली दिवाळी शेतातील अंधारात साजरी केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.