Rameshwar Waterfall: दुष्काळात वरुणराजाची कृपा, पहा रामेश्वर तीर्थक्षेत्रात वाहणारा नयनरम्य धबधबा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 24, 2023, 11:04 PM IST
बीड Rameshwar Waterfall: जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे रामेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी असलेला धबधबा हा पावसामुळे ओसंडून वाहत त्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसाने बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर जोर धरला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रामेश्वरातील धबधबा ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडल्याने तात्पुरत्या स्वरूपात पिकाला जीवदान मिळाले आहे; मात्र दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. यातच काही जिल्ह्यातील नदीवरील धबधबे पुन्हा नव्याने दिसत आहेत. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक या स्थळी भेट देत आहे.