राजस्थान विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर विजया रहाटकर यांचा मोठा दावा; पाहा व्हिडिओ - Rajasthan

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 2:08 PM IST

Rajasthan Assembly Election Result 2023 : भारतीय जनता पक्षाच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांनी आतापर्यंतच्या ट्रेंडबद्दल दावा केला आहे की, आम्ही खूप चांगली प्रगती करत आहोत. भाजपाचं सरकार स्थापन होत असून आम्ही परिश्रम घेतले अन् भाजपाचे शेकडो कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत होते. आमची संघटना खूप मजबूत आहे. तसंच आमचा प्रत्येक कार्यकर्ता मन लावून काम करतो. मोदींचं नेतृत्व खूप चांगलं आहे. तसंच आत्ता जे आकडे बघत आहोत त्यामध्येही आपण बरीच प्रगती करू. पुढं मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, सध्या उत्सवाचं वातावरण आहे. भाजपाचे संसदीय मंडळ याबाबत निर्णय घेईल. तसंच जिथं बहुमतानं सरकार बनतं आणि जिथं लोकांचा विश्वास जास्त असतो, तिथं दावेदारही जास्त असतात असंही त्या म्हणाल्या. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.