Khadakwasla Dam: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ, पाहा व्हिडिओ - Khadakwasla dam chain
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणात एक टीएमसी पाण्याने वाढ झाली आहे, तर पानशेत धरण सुद्धा पुन्हा टक्का पाण्याने भरले आहे. त्यामुळे पुणे शहराला पावसाने थोडासा दिलासा दिला आहे, असेच म्हणावे लागेल. कारण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये आजपर्यंत पूर्ण क्षमतेने एकही धरण भरलेले नाही. परंतु, आता थोडी थोडी पाण्याची वाढ होत असल्याने दिलासा मिळालेला आहे. जुलै महिन्यात दरवर्षी पुण्यातील या धरण साखळीमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करता येतो. परंतु, आज यावर्षी मात्र एकदाही पाण्याचा विसर्ग झालेला नाही. कुठलेही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजपर्यंत आता 50 टक्के पानशेत धरण भरलेले आहे. एटीएमसी पाणी हे खडकवासल्याचे वाढल्याने पुणेकरांनी सुद्धा खडकवासला धरणावर पर्यटनासाठी गर्दी केलेली आहे. आजपर्यंतचा खडकवासला धरण साखळीत सुमारे एक टीएमसी पाणी जमा झालेले आहे. तर पानशेत धरणात 50 टक्के म्हणजे 5.34 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणातील एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 13.81 टीएमसी आहे.