Pune Crime : जुगार अड्ड्यावर दरोडेखोरांनी मारला डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - gambling den
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 18, 2023, 6:01 PM IST
पुणे : Pune Crime : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळील एका छोट्या गल्लीत जुगार अड्डा सुरू असताना, काही जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेषत: या प्रकरणात 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' असा काहीसा प्रकार पोलिसांकडून होत असल्याचं दिसून येत आहे. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काय आहे प्रकरण? : याबाबत अधिक माहिती अशी की, 11 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळील छोट्या गल्लीत जुगार अड्डा सुरू होता. सर्वजण जुगार खेळण्यात मग्न होते. त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधून तिघेजण तेथे दाखल झाले. त्यापैकी एकाने पिस्तूल तर, दुसऱ्यानं तलवार काढत एक लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. याबाबत फरासखाना पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी यासंदर्भात आमच्याकडं कोणतीही तक्रार आलेली नसल्याचं सांगितलं.