अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आव्हाडांच्या बंगल्यासमोर आंदोलन - आव्हाडांविरुद्ध आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 3, 2024, 11:09 PM IST
ठाणे Protest Against Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात अजित पवार गट आक्रमक झाला. (Ajit Pawar group) अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड (Jitendra Awhad group) यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करीत आव्हाडांचा निषेध केला. तसेच प्रभू श्रीरामाचा फोटो हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जय श्री रामाच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाचा आज शिर्डी येथे मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असताना ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर महाआरती आंदोलन करून निषेध नोंदवला. (Controversial statement about Ram) यावेळी कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांना ताब्यात घेतले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
गोमूत्र शिंपडून केलं आंदोलन ठिकाण पवित्र : ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमले होते त्या ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम च्या घोषणा देत गोमूत्र शिंपडलं जात आहे. त्यामुळे भविष्यात आगामी निवडणुका लक्षात घेऊन हे दोन्ही गट पुन्हा पुन्हा भिडणार हे आता दिसू लागले आहे.