Prices Fell : भाव कोसळले, साडेतीन एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटाव्हेटर,खर्चही आला अंगलट - खर्चही आला अंगलट
🎬 Watch Now: Feature Video
कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून शेतकर्याने साडेतीन एकर क्षेत्रात कोथिंबीर केली. मात्र बाजारभाव कोसळल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील शेतकरी सुरेश संपत सुपेकर यांनी संपूर्ण कोथिंबिरीवर रोटाव्हेटर फिरवला. त्यांचा झालेला खर्चही अंगलट आल्याचे शेतकर्याने सांगितले.
काही महिन्यांपूर्वी कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळाल्याने अनेक शेतकर्यांचे पैसेही झाले. त्यामुळे नांदूर खंदरमाळ येथील सुरेश सुपेकर या तरूण शेतकर्याने साडेतीन एकर क्षेत्रात दीड महिन्यांपूर्वी कोथिंबीर केली.त्यासाठी एक लाख रुपयांच्या आसपास खर्चही केला.सध्या कोथिंबीर काढणीस आली असताना बाजारभाव कोसळले. त्यामुळे शेवटी संतापून या शेतकर्याने थेट साडेतीन एकर कोथिंबीरवर रोटाव्हेटर फिरवला आहे. परिसरातील अनेक शेतकर्यांनी पण कोथिंबीरवर असाच रोटाव्हेटर फिरवला आहे. तर काहींनी थेट कोथिंबीर सोडून दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मध्यंतरी अनेक शेतकर्यांच्या कोथिंबीरचे पैसे झाले. म्हणून आम्ही साडेतीन एकर क्षेत्रात कोथिंबीर केली. मात्र कोथिंबीर काढणीसाठी आली आणि बाजारभाव कोसळले. त्यामुळे कोथिंबीरसाठी झालेला सर्व खर्च अंगलट आला आहे. त्यामुळे संतापून रोटाव्हेटर मारण्याची वेळ आली असल्याच शेतकरी सुरेश सुपेकर म्हणाले.