PFI offices Raid : देशभरात 'पीएफआयच्या संघटनेवर छापेमारी...पहा काय म्हणाले संघटनेचे जिल्हाध्यक्ष - पीएफआयचे महाराष्ट्रात छापे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 22, 2022, 8:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पुणे: देशभरातील 11 राज्यांत 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' अर्थात 'पीएफआय' या संघटनेच्या कार्यालयांवर आज धाडी टाकण्यात आल्या (Raids on PFI offices across the country) आहेत. दिल्लीत देखील या संघटनेचे अध्यक्ष परवेज अहमद याला एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. PFI च्या तीन एजंटला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आली आहे. एटीएस आणि एनआयएच्या पथकांनी ही छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातही औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडीतही हे छापेमारी करण्यात (PFI raids in Maharashtra) आली आहे. राज्यात विविध शहरांमधून आतापर्यंत 20 संशयितांना एटीएस पथकाने ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी कारवायांसाठी या संघटनेच्या माध्यमातून फंडिंग (PFI terror funding) केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच तपासासाठी एटीएस आणि एआयएकडून देशभरात हे धाडसत्र (PFI raids by ATS and AIA) राबविण्यात येत आहे. पुणे शहरात देखील तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. यासंदर्भात पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली (President view on PFI office raids) आहे. पॉप्युलर ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद कैस शेख (Pune PFI Mohammad Kais Sheikh reaction) यांच्याशी ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.