Video : नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्याचा रुद्रावतार - Nanded District Administration

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 14, 2022, 10:04 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

नांदेड : संततधार पावसाने नांदेडमध्ये पैनगंगा नदी दुथडी भरून प्रवाहित ( Panganga River Is Overflowing ) झाली. त्यामुळे सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा ( Sahastrakund Waterfall ) रुद्रावतार पहायला मिळत आहे. या पूर सदृश्य पाण्यामुळे हदगाव, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर या तिन्ही तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय, त्याच बरोबर काही गावातील विद्युत पुरवठा देखील ठप्प झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज सकाळ पर्यंत सातत्याने बरसतोय. किनवट तालुक्यातील धामणदरी इथल्या ग्रामस्थांना तर मानवी साखळी बनवत घर गाठावे लागतंय. धामणदरी गावाला येजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून आहे त्याच पांदण रस्त्यातून प्रवास करावा लागतोय. नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून,पैनगंगा नदीला पूर येण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात अनेक जागी अतिवृष्टीची ( Nanded rains update ) नोंद झाली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने ( Nanded District Administration ) केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.