Sugarcane price agitation : पंढरपूर येथे ऊस दरासाठी आंदोलन पेटले.. ट्रॅक्टरचे टायर फोडले - Pandharpur Sugarcane price agitation
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर : तालुक्यात ऊस दराचे आंदोलन ( Sugarcane price agitation) चांगलेच पेटले असून आज (4 नोव्हेंबर) रोजी पंढरपूर - कराड रस्त्यावर टायर जाळून उसाचा दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखानदारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पंढरपूर - पुणे रोडवर भंडीशेगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर अज्ञान व्यक्तीने फोडले आहेत. तालुक्यात ऊस दराचे आंदोलन ( Sugarcane price agitation) चांगलेच पेटले असून आज (4 नोव्हेंबर) रोजी पंढरपूर - कराड रस्त्यावर टायर जाळून उसाचा दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखानदारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पंढरपूर - पुणे रोडवर बंडीशेगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर अज्ञान व्यक्तीने फोडले आहेत. ऊसाला पहिली उचल 2500 रुपये फायनल बिल 3100 रुपये मिळाले पाहिजे, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले. आहे. साखर कारखान्याने सुरू होऊन जवळपास 18 ते 19 दिवस झाले, तरीही उसाचा दर जाहीर झाला नाही. ऊस दर संघर्ष समितीने पंढरपूर मध्ये ऊस परिषद घेऊन ऊसाला पहिली उचल 2500 व अंतिम दर 31000 रुपये देण्याची मागणी केली होती. परंतु सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने अद्यापही उचल पंचवीस रुपये जाहीर केली नाही.त्यामुळे ऊस आंदोलनाची तीव्रता आता वाढू लागली आहे.सध्या ऊस आंदोलन आक्रमक वळणावर पोहोचले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST