Video वधू-वर विवाह संमेलनात 250 मुलींकरिता 11 हजारांहून अधिक तरुणांच्या रांगा - विवाह नोंदणी
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला तालुक्यातील आदिचुनचुनागिरी येथे रविवारी वोक्कलिगा समाजातील वधू-वरांचे विवाह संमेलन आयोजित Marriage Convention करण्यात आले होते. या परिषदेत हजारो तरुण सहभागी झाले होते. या दरम्यान 11 हजारांहून अधिक मुले आणि 250 मुलींनी लग्नासाठी नोंदणी केली. विशेष म्हणजे लग्नासाठी नोंदणी करणारे बहुतांश तरुण शेतकरी कुटुंबातील आहेत किंवा ते स्वतः शेतकरी आहेत. मात्र लग्नासाठी मुलींची संख्या खूपच कमी असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संमेलनासाठी सुमारे 12 हजार लोकांनी नोंदणी केल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी केवळ 250 मुलींनीच वरासाठी नोंदणी केली आहे. उर्वरित 11750 तरुणांनी लग्नासाठी वधू शोधण्यासाठी नोंदणी केली आहे. Marriage Convention In Mandya Karnataka
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST