अयोध्या निमंत्रणाच्या प्रश्नावर उदयनराजेंनी आपल्या स्टाईलने दिलं 'हे' उत्तर, पाहा व्हिडिओ - Satara News
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 4, 2024, 6:43 PM IST
सातारा Udayanraje Bhosale : अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी ‘रामलल्ला’ विराजमान होणार आहेत. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाही केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं आहे. मंदिर, मशिद, चर्चमध्ये जायला निमंत्रण लागतं का? आपण आरशासमोर उभं राहून स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे. निमंत्रण द्यायचं म्हणजे 'या, पाया पडा', असं त्यांनी म्हणायचं का? भक्तिभाव आपल्या अंत:करणात पाहिजे. मी आयोध्याला जाणार किंवा नाही जाणार यापेक्षा अंतःकरणाने मी तिथे असणार आहे, अशा शब्दात उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावर 'ही सर्व बकवास आहे', असं उदयनराजे म्हणाले.