राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचं राजीनामा सत्र; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं कारण, ऐका म्हणाले तरी काय - लक्ष्मण हाके
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/05-12-2023/640-480-20190159-thumbnail-16x9-obc-vs-maratha-reservation.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 5, 2023, 3:32 PM IST
पुणे OBC vs Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिलेली आहे. मात्र असं असताना सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा आरक्षणाचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यास बजावलं आहे. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगानं पुण्यात बैठकीचं आयोजनही केलं होतं. मात्र आता राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं आहे. अंतर्गत मतभेद आणि निकष यामुळं राज्य मागासवर्ग आयोगाचे एक एक पदाधिकारी आता राजीनामा देत आहेत. आतापर्यंत आयोगाच्या 4 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. आता तर आयोगाचे अध्यक्ष देखील राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकूणच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य का राजीनामा देत आहेत. नेमकं आयोगाच्या सदस्यांवर कोणाचा दबाव आहे का, याबाबत नुकताच आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी संवाद साधला आहे. लक्ष्मण हाके यांनी याबाबतचं कारण स्पष्ट केलं आहे.