Nilesh Rane Present In Court : पत्रा चाळ प्रकरणातील आरोपीवर काय बोलणार? निलेश राणेची राऊतांवर टीका - offensive post on Facebook
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18116999-thumbnail-16x9-nilesh.jpg)
बीड : प्रकाश आंबेडकर यांची फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी माजी खा. निलेश राणे आज केज न्यायालयात हजर झाले. याबाबत सन 2020 मध्ये केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध माजी खासदार निलेश राणे, केज तालुक्यातील दोघे विवेक अंबाड, रा. लाडेगाव, रोहन चव्हाण रा. पळसखेडा यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये व्देषभाव निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडियावर टाकल्या होत्या. राणे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केली होती. त्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, लाडेगाव ता. केज आणि विवेक चव्हाण पळसखेडा ता. केज यांच्या विरुद्ध ऑक्टोबर 2020 रोजी गु.र.नं. 432/2020 भा.दं.वि. 505 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्काकालीन पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी तपास करून दोषारोप न्यायालयात पाठविले होते.