Chandrayaan 3: संशोधनाच्या दृष्टिकोनातून पुढील 14 दिवस अत्यंत महत्त्वाचे- चारुदत्त पुल्लीवार - चंद्रयान 3
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 23, 2023, 8:52 PM IST
नागपूर: भारताने आज इतिहास रचलेला आहे. या इतिहासाचा साक्षीदार प्रत्येक भारतीय आहे. चंद्रयानाची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग सुरू होती, त्यावेळी प्रत्येकाचा श्वास हा रोखला होता. चंद्रयान मिशन 2 मध्ये ज्या चुका झाल्या त्या यावेळी सुधारण्यात आल्या. ज्यामुळे आज चंद्रावर भारताच्या चंद्रयानाने सुरक्षितपणे सॉफ्ट लँडिंग केले. लँडिंग होताना धूळ उडाल्याचं देखील लक्षात आलं आहे. पुढील 14 दिवस संशोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, अशी माहिती रमण विज्ञान केंद्राचे संचालक चारुदत्त पुल्लीवार यांनी दिली आहे. चंद्रयान 2 च्या अयशस्वी प्रयत्नानंतर इस्रोच्या या मोहिमेकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. चंद्रयान 3 ने 14 जुलै 2023 ला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती सुमारे सहापट कमी आहे. त्यामुळे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक असते. त्यातच इस्रोने यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, तेथे आतापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकले नव्हते. रविवारी 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले होते.