Gauri Decoration 2022: नाशिक येथे गौरींपुढे महिलांनी साकारले अनोखे देखावे...

By

Published : Sep 6, 2022, 11:40 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail
नाशिक - येवला शहरातील अनेक घरांमध्ये गौराईची स्थापना करण्यात आली होती. तर गौराई पुढे महिलांनी विविध असे देखावे सादर केले होते .यात वासुदेवाचा देखावा, पंढरीची वारी रिंगण सोहळा, महिषासुराचा वध, गोकुळधाम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी - तारक मेहता का उल्टा चष्माचा देखावा, सीतामाई श्रीरामाना हरिण आणून द्या असा हट्ट करते , आखाडीचा देखावा, श्रीस्वामी समर्थांचा दरबाराचा देखावा,आजचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पाहायला मिळतोय तो त्या क्रांतिवीरांच्या बलिदानामुळे, वैष्णोदेवीचा देखावा, महाराष्ट्रातील पारंपारिक सण, झोक्यावर बसलेल्या गौराई असे विविध देखावे येवला शहरातील महिलांनी आपल्या गौराई पुढे सादर केले होते. गेल्या अनेक वर्षापासून महिला आपल्या गौराईपुढे असे आगळे- वेगळे देखावे ( Gauri Decoration 2022 )सादर करत असतात. यावेळी नाशिक शहरात अनेक घरांमध्ये अनोखी देखावे बघण्यासाठी गर्दी बघण्यास मिळाली. ( News On Gauri Ganpati Decoration In Nashik )
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.