Neelam Gorhe नीलम गोऱ्हेंनी घेतला संभाजी भिडेंचा समाचार, पाहा व्हिडिओ - नीलम गोऱ्हे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई आज मंत्रालयामध्ये एका महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना Sambhaji Bhide काही प्रश्न विचारले असता त्यांनी तिला 'तू टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलीन', असे अजब विधान केले होते. या संदर्भात विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे Neelam Gorhe यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, आम्ही सर्व महिलांना भारत माते समान मानतो आणि भारतमाता विधवा नाही. भारतमाता हे सर्वांचे श्रद्धा स्थान आहे आणि त्यात आपल्याला तिचे व्यक्ती म्हणून कोणाचेही रूप निश्चित करता येणे अशक्य आहे. असे असतानाही भारतमातेच्या प्रतिकाच्या निमित्ताने संबोधून स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यात नाहक ढवळाढवळ भिडे गुरुजी करीत आहेत. हा भिडे गुरुजी यांचा प्रयत्न झोटिंग शाही आहे की काय असे वाटत आहे. मंत्रालयात असे प्रकार घडणे अतिशय गंभीर आहे. याबद्दल काळजी वाटावी असे आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST