NCP Workers Celebration : नवाब मलिक यांना जामीन; कार्यकर्त्यांकडून जल्लोष, आता कोणत्या गटात?

By

Published : Aug 11, 2023, 9:39 PM IST

thumbnail

मुंबई : राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Former Minister Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय आधारावर दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर देण्यात आला आहे. नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात उत्साह पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे.  

नवाब मलिक मुंबईचे नेतृत्व करतील : भाजपासोबत गेल्याने त्यांना जामीन मिळाला का? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नरेंद्र राणे म्हणाले, "अनिल देशमुख, छगन भुजबळ यांची सुटका झाली, तेव्हा आम्ही भाजपासोबत नव्हतो. नवाब मलिक अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबईचे नेतृत्व करतील. नवाब मलिक यांनी अजून आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला नाही. नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची भेट घेतील, त्यानंतर आपला निर्णय जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली.  

नवाब मलिक यांची निर्दोष मुक्तता होईल : या प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक तसेच पक्षाची प्रमुख तोफ नवा मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाचे आम्ही स्वागत करतो. या खटल्याचा अंतिम निर्णय आल्यावर नवाब मलिक यांची निर्दोष मुक्तता होईल, असा ठाम विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.