Nagpur Rain Update : आठ तासात नागपुरात 121 मिलिमीटर पावसाची नोंद, शहरातील अनेक भाग जलमय

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 27, 2023, 11:54 AM IST

नागपूर: शहारात आणि जिल्ह्यातील परिसरात रात्रभर मुसळधार धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठ तासात नागपुरात 121 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील नरेंद्रनगर पूलदेखील पाण्याखाली गेला आहे. रात्रीचे हा पूल पाण्याखाली गेला आहे. पुलाखालून ट्रक काढण्याचा प्रयत्न एका चालकाने केला मात्र ऐनवेळी ट्रक बंद पडला त्यामुळे ट्रक पाण्यात अडकला. दरम्यान पूल पाण्याखाली असल्याने या यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नागपूर मुख्य रेल्वे स्टेशन परिसर सुद्धा जलमय झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर पावसाचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.