Muzaffarpur Boat Capsizing : नदीत बोट उलटून 12 चिमुकल्यांचा मृत्यू; दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर - मुलांना वाचवण्यासाठी नदीत उड्या

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 10:52 AM IST

पाटणा : Muzaffarpur Boat Capsizing : नदीत बोट उलटून तब्बल 12 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ आता पुढं आलाय. बोट उलटल्याच्या घटनेत मुलं नदीच्या प्रवाहात वाहत असल्याचं स्पष्ट दिसतंय. बोट उलटल्याची माहिती मिळताच नागरिकांनी नदीत उड्या घेत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं मुलं पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. बोट उलटल्यानंतर नागरिकांनी 20 मुलांना वाचवलं आहे. मात्र, यातील 12 मुलं नदीत बुडाली आहेत. प्रशासनानं तब्बल 7 तास बचावकार्य केलं, मात्र 12 मुलं सापडली नाहीत. आजही या नदीत बचावकार्य सुरुच असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाडून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत आहे.    

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.