देशातील मुस्लिम समाज 2014 पासून जास्त घाबरलेला - आमदार अबू आजमी - मुस्लिम समाज जास्त घाबरलेला
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 19, 2023, 5:36 PM IST
अहमदनगर (शिर्डी) Abu Azmi Reaction : राहुरी तालुक्यातील गुहा येथील भेटीस होत असलेला विरोध, तसेच दोन समाजात तेढ निर्माण होण्यास मी कारणीभूत व्हायला नको, म्हणून गुहा येथील धार्मिक स्थळाची भेट रद्द केल्याची माहिती आमदार अबू आजमी (Abu Azmi) यांनी संगमनेर येथे पत्रकार परिषदेत (Abu Azmi Press Conference) दिली. राहुरी तालुक्यातील गुहा येथील हिंदू, मुस्लिमांनी मिळून मिसळून राहावे तरच देशाचं भलं होईल. गुहा येथील दौऱ्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, गुहा येथे माझ्या भेटीविरोधात मोठा जमाव जमा झाल्यानं, तिथं गेल्यास कारण नसताना जातीय सलोखा बिघडण्याची परिस्थिती निर्माण होईल. याकरिता पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीचा मान ठेवत राहुरी दौरा रद्द केला. सध्या देशातील मुस्लिमांची सत्तेत भागीदारी असूनही त्यांचं कोणी ऐकून देखील घेत नाही अशी परिस्थिती आहे.