International Yoga Day 2023: घराच्या छतावर योगा करून खासदार नवनीत राणांनी दिल्या जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा - जागतिक योग दिन
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : जागतिक योग दिनानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या शंकर नगर स्थित 'गंगा सावित्री' या निवासस्थानी घराच्या छतावर योगा केला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी योगाची विविध आसने केली आहेत. त्या रोज नित्यनेमाने योगा करतात. आज नवनीत राणा यांनी मुख शवासन, धनूर आसन, त्रिकोणासन, वक्रासन, भुजंगासन असे ऊर्जा प्रदान करणारे आसन प्रकार केले आहेत. आज जागतिक योग दिनाच्या पर्वावर खासदार राणा यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राचीन काळापासून ऋषि मुनींनी योगशास्त्र जोपासले आहे. निरोगी आगुष्यासाठी वरदान असणारे योग हे नियमित करून निरोगी राहावे, असा सल्ला दिला. योगा केल्याने शरिर स्वस्थ राहते. निरोगी आरोग्यासाठी योगा अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. योगांमुळे अनेक आजार दूर होतात.