MP Laborers Held Hostage मध्य प्रदेशातील मजूर महाराष्ट्रात ओलीस - MP Laborers Held Hostage

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 24, 2022, 9:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

खरगोन, मध्य प्रदेश, सरकार स्थलांतर थांबवण्याचे कितीही दावे करत असले तरी आजही बेरोजगारी आणि मजुरीच्या लोभापायी मजूर परराज्यात स्थलांतरण करतात. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी मजूर मोठ्या प्रमाणावर गुजरात आणि महाराष्ट्रात येतात. अहिरखेडा गावातील 21 मजूर मजुरीसाठी महाराष्ट्रात आले होते. त्यांना मजुरीसोबत जेवण दिले जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. तेथे गेल्यानंतर त्यांना ना मजुरी दिली गेली, ना जेवण व राहण्याची सोय. त्यांना परत जाऊ दिले जात नसल्याचे मजुरांच्या नातेवाईकांनी सांगितले. 21 लोकांपैकी 3 जण जंगलातून भटकून मध्यप्रदेशात पोहोचले पण इतर तिथेच अडकले आहेत. सर्वांच्या नातेवाईकांनी एसपी कार्यालय गाठून नातेवाईकांच्या सुटकेसाठी अर्ज केला आहे. mp laborers held hostage in maharashtra. MP laborers relatives appeal to SP. Khargone laborers held hostage in Maharashtra
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.