Amarnath Guha Aarti : अमरनाथ गुहा मंदिरात पहाटेची आरती, पहा व्हिडिओ - अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 7, 2023, 4:29 PM IST

अनंतनाग : १ जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा एकूण ६२ दिवस चालणार आहे. अमरनाथ दर्शनासाठी भाविकांचा जथ्था दर्शनासाठी पोहोचत आहे. यावेळी मंदिरात सकाळ संध्याकाळ आरतीही केली जात आहे. आज सकाळी केलेल्या आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. बालटाल ते मंदिरापर्यंत 13 किमी लांबीचा प्रवास अत्यंत घातक डोंगराळ प्रदेशांमधून जातो. येथे स्थानिक गावकरी यात्रेकरूंना मदत करतात. हिमालयातील दुर्गम तीर्थयात्रा यशस्वी करण्यात स्थानिक लोकांचे खूप महत्वाचे योगदान आहे. कारण त्यांना डोंगराळ प्रदेशाचे भरपूर ज्ञान तसेच अनुभव असतो. त्यांच्या अनुभवामुळे आत्तपर्यंत अनेक पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग आहेत. एक अनंतनाग जिल्ह्यातील 48 किमी लांबीचा पारंपारिक नुनवान-पहलगाम मार्ग म्हणून ओळखला जातो. तर, दुसरा गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्ग आहे जो सुमारे 14 किमी लांबीचा आहे. हा मार्ग यात्रेंकरुनसाठी अत्यंत घातक समजला जातो.  

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.