मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची जाणार अन् देवेंद्र फडणवीस होणार नवे मुख्यमंत्री - आमदार रवी राणा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर महाविकासआघाडी तसेच शिवसेना व काँग्रेससाठी हा मोठा झटका बसलेला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढली गेल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला धक्कादायक पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागलेला आहे. परंतु या पराभवाने देवेंद्र फडणीस यांच्यावरील भाजप कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. हे सरकार लवकरच सत्तेतून पायउतार होईल असं विधान आमदार रवी राणा यांनी केल आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST