MLA Dhangekar On Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो- आमदार रवींद्र धंगेकर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 23, 2023, 3:59 PM IST
पुणे MLA Dhangekar On Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पोलिसांचा तपास संशयास्पद असून (Drug mafia Lalit Patil) अनेक वरिष्ठ मंत्र्यांना सुद्धा पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. तो योग्य नाही अशी मला शंका असल्याचं आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. (Drugs Mafia Lalit Patil) यामध्ये ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊन बाहेर काहीच येणार नाही. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी आता धंगेकर यांनी केलेली. (Lalit Patil Encounter)
ललित पाटीलचा पूर्ण तपास पाहिला (MLA Ravindra Dhangekar) तर ससून हॉस्पिटलमध्ये तो राहत होता त्या ठिकाणच्या अधिष्ठानवर कोणतीही कारवाई होत नाही. ललित पाटीलला ज्यानं पळून लावलं त्या पोलीस कर्मचाऱ्यावर काही कारवाई होत नाही. ललित पाटीलची वसुली बंडगार्डन पोलीस ठाण्याचा एक पोलीस कर्मचारी करायचा. त्याची सुद्धा चौकशी होत नाही किंवा त्याला अटकही होत नाही. त्यामुळे पोलीस आणि ललित पाटील यांची सगळी मिलीभगत आहे. त्याचा तपास योग्य रीतीने होत नसल्याने त्याचा एन्काऊंटर करतील, अशी भीती धंगेकर यांनी व्यक्त केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडवणीस योग्य वेळी कागदपत्र सादर करणार असे म्हणतात. मग त्यांचं तोंड कोणी बंद केलं. ज्या भागात घटना घडली त्या बंद गार्डनचे पोलीस निरीक्षक तिथले वसुली करणारे कर्मचारी, त्याचबरोबर ससून हॉस्पिटलचे डीन ठाकूर या सगळ्यांची चौकशी करा. पण आमच्या पुण्याचं नाव खराब करू नका, अशी मागणी आज (सोमवारी) धंगेकरांनी पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे.