हैदराबाद : Nothing चा नवीन स्मार्टफोन Nothing Phone 3 भारतात लाँच होण्यास सज्ज आहे. हा एक मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे. फोन लाँच होण्यास अजूनही वेळ आहे. पण त्यापूर्वी, फोनची संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन असेल. Nothing Phone 3 2025 च्या पहिल्या सहामाहीत लाँच केला जाईल. याचा अर्थ हा फोन जून 2025 पूर्वी भारतात लाँच केला जाईल.
Nothing Phone 3 ची किंमत, स्पेसिफिकेशन (अपेक्षित)
Nothing Phone 3 स्मार्टफोन भारतात सुमारे 50 हजार रुपयांना लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.67-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले असेल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असू शकतो. तसंच, फोनला HDR10+ सपोर्ट दिला जाऊ शकतो.
फोनच्या लाँचिंगला उशीर
नथिंग फोन 3 स्मार्टफोन 2024 मध्ये भारतात लाँच होणार होता, परंतु फोनमध्ये AI फीचर्स जोडता यावेत म्हणून लाँचिंग इव्हेंट पुढं ढकलण्यात आला. या आगामी फोनचे टीझर व्हिडिओ येऊ लागले आहेत म्हणून, Nothing Phone 3 लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो.
Nothing Phone 3 ची डिझाइन
नथिंग फोन 3 त्याच्या आधीच्या स्मार्टफोनप्रमाणेच सिग्नेचर ग्लिफ बॅक डिझाइनमध्ये येऊ शकतो, ज्यामध्ये LED लाईट स्ट्रिप्स असतील. त्यांची लाईटिंग कस्टमाइज करता येईल. कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट फोनवर उपलब्ध असतील. फोनच्या समोर 6.67-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट असेल. तसंच, HDR10+ सपोर्ट उपलब्ध असेल.
Nothing Phone 3 प्रोसेसर आणि बॅटरी
Nothing Phone 3 स्मार्टफोन कंपनीच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटवर काम करेल. तसंच, Snapdragon 8 Elite चिपसेट सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये 12GB RAM सपोर्ट असू शकतो. तसेच, 512GB UFS 4.0 स्टोरेज दिलं जाईल. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये Android-आधारित NothingOS 3.0 दिला जाऊ शकतो. तसंच, कंपनी पहिल्यांदाच फोनमध्ये AI फीचर्स देणार आहे. जर आपण बॅटरीबद्दल बोललो तर फोनमध्ये 5000mAh बॅटरी सपोर्ट असू शकतो. तसंच, 45W चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.
हे वाचलंत का :