Maharashtra Political Crisis : 'यामुळे' मुख्यमंत्र्यांची झाली ही दुर्दशा - देवेंद्र भुयार - Maharashtra Political Crisis
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - मुख्यमंत्री हतबल झालेले आहे. कारण अनेक आमदार त्यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत निघून गेले. मात्र, ही परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ओढवण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या चार-पाच बडव्यांमुळे खास करून मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. मात्र, ही परिस्थिती दोन-चार दिवसात पुन्हा शांत होईल. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले लोक हे परत मातोश्रीवर दिसतील, असेही देवेंद्र भुयार हे' ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. ते नागपुरात मुंबईला रवाना होण्यापर्वी बोलत होते. मुख्यमंत्री यांनी आताही सावध होण्याची गरज आहे, असेही भुयार यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST