Minister Gulabrao Patil: अजित पवारांसोबत बरेच आमदार, ती तिथी लवकरच येईल- गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव : उद्धव ठाकरे 23 एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. माजी आमदार स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी चौकटीत बोलावे, अन्यथा संजय राऊत यांच्यासारखा माणूस माझ्याविषयी बोलणार असेल, तर सभेत घुसेल असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळे अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे युतीत येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार हे भाजपमध्ये जातील अशी सतत राजकीय चर्चा सुरु आहे. दरम्यान अजित पवारांसोबत बरेच आमदार आहेत. कोणतेही लग्न होण्यासाठी तिथीची गरज असते. ती तिथी लवकरच येईल, अजून कुळ बघावे लागेल. गुण जुळवावे लागतील. नंतर काम करावे लागेल असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.