Meera Borwankar Book Controversy : मीरा बोरवणकर यांनी विरोध केलेल्या जागेवरुन 'ईटीव्ही भारत'चा ग्राऊंड रिपोर्ट - विवादित जागेविषयी मीरा बोरवणकरांचे मत
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 15, 2023, 9:26 PM IST
पुणे : Meera Borwankar Book Controversy : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात (Madam Commissioner book) गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातल्या येरवडा येथील पोलिसांच्या 3 एकर जमिनीचा तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर केला आहे. येरवडा येथे सध्या जे येरवडा पोलीस स्टेशन तसेच येरवडा वाहतूक विभागच कार्यालय आहे आणि ही संपूर्ण जागा 3 एकरमध्ये आहे. आता तिथं एका इमारतीचं काम बंद पडलेलं आहे आणि बाकी अशीच पडीक जमीन आहे.
सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्याचा डाव: माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून सरकारी जमीन खासगी व्यक्तीला देण्याचा डाव तत्कालीन पालकमंत्र्यांचा होता असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. सरकारी जमिनीचा लिलाव करून ती खासगी व्यक्तीला देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांचा आग्रह होता असं बोरवणकर लिहिलंय. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.