ETV Bharat / entertainment

मॅडॉक फिल्म्सनं हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सच्या 8 चित्रपटांची 'स्त्री 3'सह केली घोषणा, पोस्टर रिलीज - MADDOCK FILMS

मॅडॉक फिल्म्सनं 'स्त्री 2', 'भेडिया 2' आणि 'महामुंज्या'ची घोषणा केली आहे. प्रत्येक चित्रपटाची रिलीज तारीख जाणून घेऊया...

maddock films
मॅडॉक फिल्म्स (मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सच्या 8 चित्रपटांची 'स्त्री 3'सह घोषणा(Film Announcement Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 3, 2025, 10:33 AM IST

मुंबई : 2024 मध्ये 'स्त्री 2' आणि 'मुंज्या'नं त्यांच्या जबरदस्त कहाणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटांच्या सीक्वेलची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा निर्माते संपवणार आहे. 'स्त्री 3', 'महा मुंज्या' आणि 'भेडिया'सह मॅडॉक फिल्म्सनं हॉरर-कॉमेडी विश्वातील 8 चित्रपटांची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कधी प्रदर्शित होतील. या चित्रपटांना मोठ्या पडद्यावर येण्यासाठी प्रेक्षकांना अजून किती वाट पाहावी लागणार आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मॅडॉक फिल्म्सनं या 8 चित्रपटांची केली घोषणा :

मॅडॉक फिल्म्सनं अलीकडेच सोशल मीडियावर एक सुंदर पोस्टर शेअर केली आहे, यामध्ये त्यांनी 8 आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटांची घोषणा केली आहे. पोस्टरबरोबर कॅप्शनमध्ये त्यांनी असं लिहिलं, 'दिनेश विजन मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील 8 चित्रपट सादर करत आहेत जे तुम्हाला हास्य, दहशत, थरार आणि वाइल्ड राइडवर घेऊन जातील.'

'या' 8 चित्रपटांची घोषणा करण्यात आली

1. थामा (दिवाळी 2025)

2. शक्ती शालिनी (31 डिसेंबर 2025)

3. . भेडिया 2 (14 ऑगस्ट 2026)

4. चामुंडा (4 डिसेंबर 2026)

5. स्त्री 3 (13 ऑगस्ट 2027)

6. महामुंज्या (24 डिसेंबर 2027)

7. पहला महायुद्ध (11 ऑगस्ट 2028)

8. दूसरा महायुद्ध (18 ऑक्टोबर 2028)

हॉरर-कॉमेडी चित्रपट : 'थामा'मध्ये आयुष्मान खुराना, रश्मिका मंदान्ना, अपारशक्ती खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल यांसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 2025च्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. यानंतर 'शक्ती शालिनी' 31 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. वरुण धवनच्या 'भेडिया'चा सीक्वेल 'भेडिया 2' हा 14 ऑगस्ट 2026 मध्ये येत आहे. यानंतर 'चामुंडा' 4 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होईल.

हॉरर-कॉमेडी चित्रपट कधी होईल रिलीज : 'स्त्री' फ्रँचायझीचा तिसरा भाग, 'स्त्री 3' 2027 मध्ये 13 ऑगस्ट रोजी रिलीज होईल. 2024 मध्ये 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी यांच्या विशेष भूमिका होत्या. अक्षय कुमार आणि वरुण धवन यांनी चित्रपटात कॅमिओ केला होता. तमन्ना भाटियानं 'स्त्री 2'मध्ये जबरदस्त डान्सनंबर केला होता. यावर्षी रिलीज झालेल्या 'मुंज्या'चा सीक्वेल 'महा मुंज्या' 24 डिसेंबर 2027 रोजी रिलीज होईल. 'मुंज्या'मध्ये अभय वर्मा आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत होते. तर 2028 मध्ये 'पहला महायुद्ध' 11 ऑगस्ट आणि 'दुसरा महायुद्ध' 18 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येईल. सध्या या चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.