ETV Bharat / sports

ऑल इज नॉट वेल... प्लेइंग 11 मधूनच नव्हे तर भारतीय संघातूनही रोहित बाहेर - ROHIT SHARMA TEST CRICKET

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळत नाही. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह या सामन्यात कर्णधार आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिला कसोटी सामना जिंकला होता.

Rohit Sharma
रोहित शर्मा (Social Media)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 3, 2025, 9:36 AM IST

सिडनी Rohit Sharma Out From Squad : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं 2024 साली T20 विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांनी ज्या खेळाडूला महान खेळाडूचा दर्जा दिला होता. आज त्याच खेळाडूची कसोटी कारकीर्द धोक्यात आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, असं दिसतंय. रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे, पण ऑस्ट्रेलियाच्या सततच्या फ्लॉपमुळं त्यानं पाचव्या टेस्ट मॅचमध्ये स्वतःला विश्रांती दिली. प्रत्येक भारतीय चाहत्यासाठी हा मोठा धक्का होता. या सगळ्यात रोहित शर्मा केवळ प्लेइंग 11 मधूनच बाहेर नाही तर तो भारतीय संघातूनही बाहेर झाला आहे.

रोहित शर्मा संघाबाहेर : वास्तविक, कोणताही क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघ आपापली टीम शीट तयार करतात. ज्यात प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंशिवाय संघातील इतर खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. सिडनी कसोटीपूर्वीही असंच घडलं. दोन्ही संघांनी आपापली टीम शीट जाहीर केली. यात भारतीय संघाच्या टीम शीटमध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहित शर्माचं नाव त्यात नव्हतं. विश्रांती घेतलेल्या खेळाडूचे नाव टीम शीटच्या बाहेर असल्याचं यापूर्वी कधीही घडलं नाही. तसंच टीम शीटमध्ये कर्णधाराचं नाव न राहिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

रोहित शर्माचा फॉर्म खराब : 2024 हे वर्ष रोहित शर्मासाठी चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ल्ड कप जिंकला. यानंतर टीम इंडियानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला, पण त्या मालिकेत रोहित शर्मा फ्लॉप ठरला. याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतही रोहित शर्मा फलंदाजीत काही विशेष करु शकला नाही. याशिवाय त्यानं ऑस्ट्रेलियातही 5 डावात केवळ 31 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचा अंत अगदी जवळ आल्याचं दिसते. तो अतिशय वाईट फॉर्ममधून जात आहे.

हेही वाचा :

  1. 18 वर्षांनंतर पाहुण्यांचा संघ आफ्रिकेत सामना जिंकत भारताची मदत करणार? 'इथं' पाहा निर्णायक मॅच लाईव्ह
  2. रोहित शर्माच्या टेस्ट करिअरचं 'द एंड'? 28 सेकंदाच्या व्हिडिओनं खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.