Purushottam Khedekar : छत्रपती शंभूराजेंवरुन सुरू असलेल्या वादात आता मराठा सेवा संघाची उडी, पुरुषोत्तम खेडेकरांनी दिली प्रतिक्रिया - छत्रपती शंभूराजेंवरुन वाद सुरुच

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 3, 2023, 6:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

बुलढाणा  'छत्रपती संभाजी महाराज Chhatrapati Sambhaji Maharaj हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते', माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा मराठा सेवा संघ समर्थन Support to Ajit Pawar करते, अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष Maratha Seva Sangh Founder President पुरुषोत्तम खेडेकर Purushottam Khedekar यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. छत्रपती हे सर्वच धर्माचे रक्षक होते. त्यामुळे त्यांनी आपला स्वराज्य वाढवून स्वराज्याचे रक्षण करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांना 'स्वराज्य रक्षक' ही पदवी महत्त्वाची आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या राजवटीमध्ये रयतेचे राज्य होतं आणि या रयतेच्या राज्यामध्ये सर्वच धर्माचे लोक राहत होते. या सर्व धर्मांचे रक्षण करण्याचे काम या छत्रपतींच होतं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक हीच पदवी महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला. छत्रपती बद्दल असं वादळ उठवने चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.