Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ - Manoj Jarange Patil news
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 29, 2023, 4:25 PM IST
|Updated : Oct 29, 2023, 5:22 PM IST
जालना Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यासह देशभरात गाजत आहे, या मुद्द्यामुळं मराठा समाज बांधवांकडून राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलनं सुरू आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Hunger Strike) यांनी पुन्हा 25 तारखेपासून आमरण उपोषणाला अंतरवली सराटी येथे सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे, तसेच त्यांनी औषधोपचार घ्यायलासुद्धा नकार दिलाय, तर आज त्यांची तब्येत खालावली आहे. आता अंतरवली सराटी गाव देखील आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. आता सरकार याकडे गांभीर्यानं पाहणार का? आरक्षणासाठी मार्ग मोकळा करणार का? का सरकार घेणार बघ्याची भूमिका? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.