Maratha Protest : आमदार प्रकाश सोळंकेंचं घर जाळल्यानंतर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, एकेरी उल्लेख करत म्हणाले... - अंतरवाली सराटी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/30-10-2023/640-480-19896529-thumbnail-16x9-prakashsolanki.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 30, 2023, 6:00 PM IST
जालना Maratha Protest : मराठा आंदोलनानं आता मराठवाड्यात रौद्र रुप धारण केलंय. सोमवारी (३० ऑक्टोबर) आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करत त्यांचं घर पेटवून लावलं. आंदोलकांनी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्याही पेटवून लावल्या. आमदार सोळंके आणि त्यांचं कुटुंब सध्या सुखरूप आहे. या घटनेनंतर दुपारी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी या उपोषणस्थळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी या घटनेसाठी प्रकाश सोळंके यांनाच जबाबदार धरलं. 'आमदार प्रकाश सोळंके यांना मराठ्यांनीचं मोठं केलं. ते कधी सोसायटीमध्ये देखील निवडून येऊ शकत नाही. ते काहीतरी बोलल्याशिवाय मराठे त्यांच्या वाट्याला जाऊ शकत नाही', असं जरांगे पाटील म्हणाले.