मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला; इंदौर पुणे महामार्ग बंद - Manmad Railway Bridge collapse
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 29, 2023, 7:53 AM IST
|Updated : Nov 29, 2023, 8:09 AM IST
मनमाड Manmad Railway Bridge : मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदौर पुणे महामार्गावर असलेला रेल्वे ओव्हरब्रिज आज पहाटे कोसळलाय. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ब्रिटीशकालीन असलेल्या या पुलाचा मध्यभाग ढासळल्यान इंदौर-पुणे महामामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदौर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आलीय. मनमाड शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुल कोसळलाय. या पुलाची मुदत संपली असल्यानं त्याचं मागेच स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आले नव्हती. आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान या पुलाच्या पूर्वेकडील मोठा भाग कोसळला. यामुळं मातीचा असलेला मोठा भाग सुरक्षा कठड्यासहित कोसळला. यावेळी कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.