VIDEO : दुचाकीस्वाराला समजवणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला चपला जोड्यांनी मारहाण, 2 जणांना अटक - उपजिल्हाधिकारी मारहाण मंदसौर
🎬 Watch Now: Feature Video
मंदसौर (म.प्र) - मंदसौर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. उपजिल्हाधिकारी अरविंद माहौर यांची पिपलिया मंडी येथे निवडणूक कार्यसंबंधी ड्यूटी लागली होती. तेथे जात असताना वाटेत त्यांच्या कारसमोर एक दुचाकीस्वार वारंवार येत होता. त्यामुळेस, माहौर हे वाहनातून खाली उतरले व ते दुचाकीस्वाराला सल्ला देऊ लागले. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला रेस्टॉरेंट चालवणारा मोहनलाल व त्याची पत्नी भावना यांनी उपजिल्हाधिकारी अरविंद यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंदसौर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध कलम ३५३, ३३२, १८६, ३२३, २९४, ३४ आणि एससी - एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST