Satara Crime: बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणं प्रियकराला पडलं महागात, मुलं चोरणारा व्यक्ती समजून बेदम चोप पाहा व्हिडिओ - Police Station

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 1, 2022, 4:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Satara Crime सातारा: कोण, कशासाठी काय करेल, Satara Crime याचा काही नेम नसतो. असाच एक जुगाड तरूणाच्या अंगलट आल्याने त्याला मार खावा लागल्याची घटना सातार्‍यातून समोर आली आहे. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रेमवीराची जमावाने चांगली धुलाई केली आहे. burka beaten up as child stealer मुले पळविणारा समजून लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. सातार्‍यातील तामजाईनगर परिसरात ही घटना घडली आहे. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जाणे त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. प्रेयसीचे घर एका शाळेच्या परिसरात होते. त्यामुळे त्याने शाळेचा पत्ता विचारला. meet his girlfriend wearing शाळेचा पत्ता विचारल्याने तसेच पुरूषी आवाजामुळे बुरख्यातील व्यक्ती ही मुले पळविणारी असल्याच्या संशयावरून नागरिकांनी त्याची धुलाई केली आहे. मात्र, त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या हे प्रकरण पोलीस ठाण्यात Police Station गेले असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.