Leopard Fight In Nashik: चक्क नारळाच्या झाडावर बिबट्याची भांडणे; पाहा व्हिडीओ - male leopard and female leopard
🎬 Watch Now: Feature Video
देवळाली भागातील बार्न्स स्कूल जवळ बिबट्या आढळून आल्याची घटना ताजी असताना सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातही दोन बिबटे आढळले. मात्र ते नाराळाच्या झाडावर भांडत ( Leopard fighting on a coconut tree ) होते. सकाळी सात वाजता बिबट्यांनी दर्शन दिल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील दिलीप कोंडाजी घुमरे आणि सुनील सखाहारी घुमरे यांच्या घराशेजारी असलेल्या नारळाच्या उंच झाडावर दोन बिबटे सरसर चढतांना, भांडताना व्हिडीओमध्ये कैद ( fight between male leopard and female leopard ) झाले आहेत. शांताराम विठोबा घुमरे यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर बिबटे चढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाला कळवण्यात आले ( Leopard fighting video captured in mobile ) आहे. मात्र अवघ्या काही क्षणात हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला ( Leopard fighting video Viral ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST